Dailyhunt
वाल्हेकरांना बसला धक्‍का

वाल्हेकरांना बसला धक्‍का

प्रभात 5 years ago

वाल्हे -येथील करोना बाधित डॉक्‍टर व वाल्मिकनगरातील एक तरुण करोनामुक्‍त होवून मंगळवारी (दि. 4) घरी परणार होता, त्यामुळे गावात त्यांच्या स्वागताची तयारी सुरू होती. तरुणाच्या कुटुंबातील सातजण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

करोनाबाधित युवकाच्या कुटुंबातील सात जणांना करोनाची लागण झाल्याचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला असून यात एका चार महिन्यांच्या मुलीचाही समावेश असल्याची माहिती पुरंदर तालुक्‍याच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली. गावात आतपर्यंत 11 जण पॉझिटिव्ह आढळले असून दोघे करोनावर मात करीत घरी परतले आहे. तर 9 जणांवर उपचार सुरू आहेत.

वाल्मिक नगरातील सात जण करोना पॉझिटिव्ह आढळल्याने या नगरामधील प्रत्येकाची तपासणी ग्रामपंचायत, करोना दक्षता समिती, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी व शिक्षक आदींच्या मदतीने तातडीने तपासणी सुरू करणार असल्याची माहिती सरपंच अमोल खवले यांनी दिली.

दरम्यान, या बाधितांच्या संपर्कातील हाय रिस्कमध्ये 9 तर लो रिस्कमधील 12 व्यक्‍ती असल्याची माहिती वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे, पर्यवेक्षक राजेंद्र दळवी यांनी दिली. नागरिकांनी काळजी घेत, नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat