Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वाणेवाडी, मुरूम पुढील १४ दिवसांसाठी लॉकडाऊन

वाणेवाडी, मुरूम पुढील १४ दिवसांसाठी लॉकडाऊन

प्रभात 6 years ago

सोमेश्वरनगर(प्रतिनिधी) - बारामती तालुक्यातील मुरूम या ठिकाणी आज करोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्यानंतर वाणेवाडी आणि मुरूम ग्रामपंचायतीने १४ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. याबाबत वाणेवाडीचे उपसरपंच संजय जगताप आणि मुरूमचे उपसरपंच निलेश शिंदे यांनी माहिती दिली.

सोमेश्वरनगर परिसरात आज पहिलाच करोना पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली. तर वाणेवाडीचा भरलेला आठवडे बाजार करोनाचा रुग्ण सापडल्यामुळे दुपारीच बंद केला तर मुरूम आणि वाणेवाडी या गावातील दवाखाने, मेडिकल आणि किराणामाल ही दुकाने वगळता इतर दुकाने पुढील १४ दिवस बंदच राहतील.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat