Friday, 18 Oct, 10.43 pm प्रभात

मुख्य पान
'वारं फिरलंय, इतिहास घडणार'- सुप्रिया सुळे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज साताऱ्यात जोरदार पावसातही सभा घेतली. पवार बोलायला उभे राहिले आणि तुफान पाऊस सुरु झाला. परंतु पवारांनी भर पावसातही सभा सुरुच ठेवली. यावेळी बोलताना पवारांनी साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडली.

दरम्यान, 'साताऱ्याच्या मातीनं आज पुन्हा इतिहास घडविला. तुफान पावसातही माणसांनी तुडूंब भरलेलं मैदान आदरणीय शरद पवार साहेबांना ऐकत होतं. 'वारं फिरलंय, इतिहास घडणार', हा संदेश देणाऱ्या या सभेनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वांनाच नवी उर्जा मिळाली', असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top