Dailyhunt
#video: सरकारनं मतदानाची सक्ती करायला हवी- नाना पाटेकर

#video: सरकारनं मतदानाची सक्ती करायला हवी- नाना पाटेकर

प्रभात 6 years ago

मुंबई- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील 3,237 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. सामान्य नागरिकांसोबतच, अनेक कलाकारांनी, राजकीय नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

दरम्यान, देशासह राज्यातील महत्वाच्या मुद्द्यांवर परखडपणे मत मांडणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी सुद्धा दादरमधील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नानांनी काही राजकीय मुद्यांवर आपले रोखठोक मत सुद्धा मांडले. आज मतदानाला गर्दी कमी आहे. हे चांगलं नाही. सरकारनं मतदानाची सक्ती करायला हवी, पण घरी बसून मतदान करण्याची सोय करायला हवी, असं यावेळी नाना म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat