Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Vigneshwara Temple Ozar : अष्टविनायक तिर्थक्षेत्र 'श्री क्षेत्र ओझर' येथे सुरु होणार नौका विहार !

Vigneshwara Temple Ozar : अष्टविनायक तिर्थक्षेत्र 'श्री क्षेत्र ओझर' येथे सुरु होणार नौका विहार !

Vigneshwara Temple Ozar : तीर्थक्षेत्र ओझर येथील विघ्नहराच्या मंदिराजवळ असणाऱ्या येडगाव जलाशयात नौका विहारास परवानगी मिळावी यासाठी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट सातत्याने पाठपुरावा करत होते.

देवस्थान ट्रस्टच्या सततच्या पाठपुराव्याला यश येऊन महाराष्ट्र शासनाने श्रीक्षेत्र ओझर येथील जलाशयात नौका विहार करण्यास परवानगी दिल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष बाळकृष्ण कवडे यांनी दिली आहे.

अष्टविनायक गणपती मधील अत्यंत पवित्र तिर्थक्ष येथे येणा-या भाविकांना सुखसुविधा पुरविण्याचे कार्य देवस्थान ट्रस्ट गेली अनेक वर्ष करत आहे. “विघ्नहर्ता” बापा मोरया हा नवसाला पावणारा गणपती असा अनेक गणेश भक्तांचा अनुभव आहे.

महाराष्ट्र शासनाने जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित केल्यापासून ह्या तालुक्यात अष्टविनायक दर्शनाबरोबरच पर्यटन करण्यास देशभरातून भाविक येत आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे.

श्री विघ्नहर मंदिराशेजारी येडगाव धरणाचा मोठा जलाशय असल्यामुळे सदर जलाशयात नौका विहारास परवानगी मिळावी यासाठी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट सातत्याने पाठपुरावा करत होते.

देवस्थान ट्रस्टच्या सततच्या पाठपुराव्याला यश येऊन महाराष्ट्र शासनाने श्रीक्षेत्र ओझर येथील जलाशयात नौका विहार करण्यास परवानगी दिल्यामुळे श्री क्षेत्र ओझरच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार असून भाविक व पर्यटक येथे आल्यानंतर नौकाविहार करण्याचा आनंद या उपक्रमामुळे घेणार असून स्थानिक रोजगार, पर्यटन व परिसराचा सर्वांगीण विकास होऊन देवस्थान ट्रस्टच्या वैभवात भर पडणार आहे.

सदर परवानगीच्या प्रतीक्षेत देवस्थान ट्रस्ट होते आता ती परवानगी मिळाल्याने “श्रीं” चा जन्मोत्सव सोहळा जवळच आला आहे या शुभमुहूर्तावर नौका विहार सुरु करण्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे यांनी सांगितले.

या परवानगी साठी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व विश्वस्त, विद्यमान विश्वस्त, आमदार साहेब, जलसंपदा मंत्री, मुख्यमंत्री आणि विशेषतः जलसंपदा अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे कवडे यांनी आवर्जून सांगितले आणि त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat