Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Vikas Lavande : शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंना अटक! पुणे पोलिसांची कारवाई

Vikas Lavande : शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंना अटक! पुणे पोलिसांची कारवाई

प्रभात 2 months ago

Vikas Lavande : गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेकीची घटना घडली होती. या घटनेवरुन लवांडे यांनी आपल्या जीवला धोका असल्याचे सांगितले होते.

अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

विकास लवांडे यांना पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त समोर आले आहे. वारकरी संप्रदायात घुसखोर आले असून त्यांनी वारकरी संप्रदायात द्वेष पसरवला असल्याच्या आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्यावरुन दाखल फिर्यादीवरुन त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी भाजपसाठी काम करणाऱ्या २० कीर्तनकारांची नावे त्यांनी जाहीर केली होती.

काही दिवसांपूर्वी संग्राम बापू भंडारे यांनी त्यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना यापूर्वी अंतरिम जामीन मंजूर झाला होता.

दरम्यान, विकास लवांडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज पुणे न्यायालयाने बुधवारी फेटाळला. त्यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात आली नसल्याने हे संरक्षण काढून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना विकास लवांडे यांनी, आपल्याला नेमक्या कोणत्या गुन्ह्यात अटक करण्यात आली याची माहिती पोलिसांनी दिली नसल्याचा आरोप केला. तसेच, आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पुणे पोलिसांकडून "चोर सोडून संन्याशाला फाशी" देण्याचा प्रकार सुरू असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी शाईची बाटली विकास लवांडे यांच्या अंगावर ओतली होती. त्यांच्या चेहऱ्याला काळं फासलं आलं होतं. या प्रकरणी दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat