Tuesday, 14 Aug, 12.00 pm प्रभात

क्रीडा
वीरेंद्र सेहवागने गायले देशभक्तीपर 'हे' गाणे, जिंकली मने!!!

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने ट्विट करत त्याचे आवडते देशभक्तीवर गाणे गायले आहे. हे गाणे गाण्याच्या अगोदर त्याने सांगितले की, मी गायक नाही. मला गाणे गाता येत नाही. परंतु, जेव्हा देशासाठी गाणे गायचे असते तेव्हा या बाकीच्या गोष्टी गौण ठरतात. तुमच्यामध्ये देशाप्रतीचे प्रेम असले पाहिजे आणि यामुळेच मी माझे आवडते गाणे गात आहे.

त्यानंतर त्याने " ये देश है वीर जवानोंका, अलबेलोंका मस्तानोंका, इसीस देश का यारो क्या कहना, ये देश हे दुनियाका गहना !!!" हे देशभक्तीपर गाणे गायले. त्यानंतर त्याने सर्वांना आपले आवडते देशभक्तीपर गाणे गाण्याचे आवाहन केले.

सेहवाग दररोज ट्विट करण्यासाठी सध्या खूप प्रसिद्ध होत आहे. तो रोज काहीतरी ट्विट करत असतोच. परंतु आज त्याने देशभक्तीपर गाणे गाऊन अनेकांची मने जिंकली आहे. #ProudlyIndian या ट्विटरवरील मोहिमेत सहभागी होत त्याने ही गाणे गायले आहे.

Dailyhunt
Top