Tuesday, 20 Nov, 8.06 am प्रभात

मुखपृष्ठ
विविधा : दत्ता महाडिक पुणेकर

माधव विद्वांस

ग्रामीण भागातील थकल्या भागलेल्याना विनोदांची फुंकर घालणारे लोकनाट्य अभिनेते ,गायक,संगीतकार दत्ता महाडिक पुणेकर यांची आज जयंती. आंधळं म्हणतंय फुटलं तांबडं… मोमीन कवठेकर यांनी लिहिलेल्या या लोकगीताला संगीताचा व आपल्या आवाजाचा बाज देऊन अस्सल गावरान शब्दात दत्ता महाडिक सादर करायचे. पुणेकर जी गाणी गात असत त्यातील बहुतांशी कवने लोकगितांचे रचनाकार बशीरभाई कमृद्दीन मोमीन कवठेकरांची असत.त्यांची हयात लोकगीते व वगनाट्ये लिहिण्यात व्यतीत झाली. पूर्वी जसे होनाजीने कवने करावीत व ती बाळा करंजकरांनी गायची असे समीकरण होते तसेच बशीरभाईंनी कवन करायचे व ते दत्ताजींनी गायचे असा पायंडाच पडला होता.पण बशीरभाईंची मात्र उपेक्षा झाली.कोठल्याही तमाशा मधे नेहमीच कलाकारांच्या जोड्या सवाल जबाबाने गाजत असत व त्या जोडीच्या नावानेच फड प्रसिद्ध व्हायचा.

Top