Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Voter List Revision: मतदार यादी पुनरीक्षणाला वेग! ८ ऑगस्टपूर्वी 'हे' काम करा, अन्यथा नाव कापले जाण्याची शक्यता

Voter List Revision: मतदार यादी पुनरीक्षणाला वेग! ८ ऑगस्टपूर्वी 'हे' काम करा, अन्यथा नाव कापले जाण्याची शक्यता

प्रभात 2 weeks ago

Voter List Revision - महाराष्ट्र राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण ( एस आय आर ) कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू असून, सध्याच्या मतदारांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल. ओ) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांनी केले आहे.

या अर्जांच्या आधारे १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्यात येणार आहेत. ज्या पात्र नागरिकांची नावे प्रारूप यादीत नसतील किंवा नव्याने मतदार नोंदणी करावयाची असेल, त्यांना १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना क्रमांक ६ भरून नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

तसेच मतदार यादीतील दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक ८, तर चुकीच्या किंवा अपात्र नावांबाबत हरकती नोंदविण्यासाठी नमुना क्रमांक ७ सादर करता येणार आहे. या कालावधीत प्राप्त अर्जांची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे,

दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची माहिती अथवा खोटी घोषणा केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३१ अंतर्गत संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. त्यानुसार एका वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होण्याची तरतूद आहे.

राज्यातील अंतिम मतदार यादी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २२ व २३ नुसार नाव समाविष्ट करणे किंवा दुरुस्ती करणे शक्य असून, ही प्रक्रिया 'सतत अद्ययावत' स्वरूपात सुरू राहणार असल्याचेही कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat