Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
weather update : देशात उष्णतेची लाट.! पंतप्रधान मोदींचे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

weather update : देशात उष्णतेची लाट.! पंतप्रधान मोदींचे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

प्रभात 1 month ago

Weather update - देशातील विविध राज्यांमध्ये सध्या भीषण उष्णतेची लाट पसरली असून तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशातील नागरिकांना वाढत्या उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांनी स्वतःला हायड्रेटेड ठेवावे आणि घराबाहेर पडताना सोबत पाणी नक्की ठेवावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत वाढत्या तापमानाबद्दल चिंता व्यक्त केली. देशाच्या विविध भागांमध्ये तापमान सातत्याने वाढत आहे आणि यामुळे दैनंदिन जीवनातील अडचणीही वाढू लागल्या आहेत. मी माझ्या सर्व देशवासीयांना आवाहन करतो की, त्यांनी उन्हापासून बचावासाठी शक्य तितकी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे.

उष्णतेच्या या कठीण काळात नागरिकांनी एकमेकांना मदत करावी, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. कृपया स्वतःला हायड्रेटेड ठेवा आणि घराबाहेर पडताना पाणी सोबत ठेवायला विसरू नका. अशा हवामानात तुमची संवेदनशीलता इतरांसाठी मोठा आधार ठरू शकते. शक्य असल्यास, कोणत्याही तहानलेल्या व्यक्तीला एक ग्लास पाणी नक्की पाजा.

उन्हाळ्यात अनेक जण सामाजिक भावनेतून रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करतात. पंतप्रधानांनी अशा नागरिकांचे विशेष कौतुक केले. “जे लोक उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून आपल्या घराबाहेर किंवा दुकानांबाहेर पाण्याचे माठ (घडे) ठेवतात, जेणेकरून कोणालाही तिथून पाणी पिता येईल, त्यांच्या या सेवाभावी वृत्तीची मी मनापासून प्रशंसा करतो, अशा शब्दांत पंतप्रधानांनी या उपक्रमांना दाद दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat