Monday, 21 Sep, 12.17 pm प्रभात

ताज्या बातम्या
'या' दिवशी प्रदर्शित होणार 'सत्यमेव जयते 2', जॉन अब्राहमचा फर्स्ट लूक आउट

मुंबई - बॉलिवूडचा ऍक्शन हिरो म्हणजेच अभिनेता 'जॉन अब्राहम'चा 15 ऑगस्ट 2018 रोजी 'सत्यमेव जयते' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. याच चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मिलाप मिलन झवेरी दिग्दर्शित 'सत्यमेव जयते 2' चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती.

दरम्यान, याच पार्श्ववभूमीवर आज 'सत्यमेव जयते 2′ चित्रपटातील लीड हिरो जॉन अब्राहमचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या पोस्टर्सवर जॉनचा दमदार अवतार दिसून येत असून, 'जिस देश की मैया गंगा है.., वहा खून भी तिरंगा है' अशी टॅग लाईन सुद्धा देण्यात आली आहे. 2018 मध्ये रिलीज झालेल्या सत्यमेव जयतेचे बजेट फक्त 45 कोटी रुपये होते. तर चित्रपटाची कमाई 88 कोटी रुपये होती.

दरम्यान, आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा पूर्वीचाच थरार आणि राष्ट्रभक्‍तीचा तडका असणार आहे. यावेळी भ्रष्ट्राचार आणि राजकीय स्टंटबाजीचाही उपयोग कसा करून घेतला जाणार आहे, असे लवकरच समजेल. याशिवाय चित्रपटात अभिनेत्री दिव्या खोसलाचा रोल नक्की काय असेल, हे देखील समजेल. या चित्रपटाचा सिक्‍वल ऑक्‍टोंबर 2020 मध्ये प्रदर्शित करण्यात येणार होता. पण आता 'सत्यमेव जयते 2' चित्रपट 12 मे 2021 रोजी ईद च्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top