Dailyhunt
'या' गावांमध्ये आज मध्यरात्रीपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन !

'या' गावांमध्ये आज मध्यरात्रीपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन !

प्रभात 5 years ago

राजगुरूनगर : खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील ज्या गावांमध्ये 5 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्या गावांमध्ये 10 दिवसांचे लोकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने हि घोषणा केलीआहे

ज्या शहर व गावात पाच पेक्षा अधिक रुग्ण असतील त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून उद्यापासून पुढील 10 दिवस कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे. औद्योगिक क्षेत्र सुरू राहणार आहे व शेती संबंधित खते औषधांची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

जुन्नर, खेड, चाकण, आळंदी या प्रमुख नगर परिषद क्षेत्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असल्याने चारही शहरे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या शहरांमध्ये दुध वितरण व वैद्यकीय सेवा, बँक वगळता सर्व दुकाने, रस्ते बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकरी संजय तेली यांनी दिले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat