Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Youth Congress protest : पेपरफुटी आणि बेरोजगारीविरोधात युवक काँग्रेसचा एल्गार; हातात मशाली घेऊन काढला आक्रोश मोर्चा

Youth Congress protest : पेपरफुटी आणि बेरोजगारीविरोधात युवक काँग्रेसचा एल्गार; हातात मशाली घेऊन काढला आक्रोश मोर्चा

प्रभात 2 weeks ago

Youth Congress protest - देशपातळीवरील परीक्षा घोटाळे, पेपरफुटी, वाढती बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात आज युवक काँग्रेसने एल्गार पुकारला. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मशाल आक्रोश मोर्चाने रस्ते प्रचंड घोषणाबाजीने दणाणून सोडले.

काँग्रेस भवन ते झाशीची राणी (बालगंधर्व) चौकादरम्यान निघालेल्या या आंदोलनात शेकडो युवक व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

हातात पेटत्या मशाली घेऊन केंद्र सरकारच्या युवकविरोधी धोरणांचा निषेध करत आंदोलकांनी पेपरफुटी बंद करा, रोजगार द्या अशा तीव्र घोषणा दिल्या. या पार्श्वभूमीवर परीक्षांमधील घोळाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; अन्यथा पंतप्रधानांनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी उदय भानू चिब यांनी केली. तरुणांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष रस्ता ते संसदेपर्यंत सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

या मोर्चात राष्ट्रीय महासचिव अजय छिकारा, प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, राष्ट्रीय सचिव नवज्योत संधू, माध्यम प्रमुख अक्षय जैन यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, दोषींवर कठोर कारवाई करणे, रिक्त सरकारी पदांची तातडीने भरती करणे आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारणे, अशा प्रमुख मागणी या वेळी करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat