Wednesday, 21 Apr, 11.53 am प्रभात

मुखपृष्ठ
युवा पिढीतील क्रॅश डाएटचा अतिरेक धोकादायक

लंडन - 18 ते 25 या वयोगटातील युवापिढी क्रॅश डायटिंगचा अतिरेक करत असून हे या पिढीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचा निष्कर्ष इंग्लंडमधील एका संशोधनात समोर आला आहे वजन कमी करून बारीक होण्याच्या नादात युवापिढी क्रॅश डायटिंग फॉलो करत असून अशा प्रकारचे आहार नियोजन चुकीचे असल्याचे मत या संशोधनात मांडण्यात आले आहे.

ब्रिटनमधील एका न्यूट्रिशन ब्रँड कंपनीने देशातील २६४४ महिला आणि पुरुष यांचे संशोधन केले तेव्हा 92 टक्के महिला आणि पस्तीस टक्के पुरुष 18 ते 25 या वयोगटात असूनही सात वर्षाच्या मुलाएवढा आहार घेत असल्याचे निदर्शनास आले या सर्वेक्षणामध्ये भाग घेतलेला 80 टक्के लोकांनी आपण वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारचा आहार घेत असल्याची कबुली दिली वजन कमी करण्यासाठी दररोज १५30 ते १६49 उष्मांक मिळतील अशा प्रकारचे आहार घेण्याचे नियोजन त्यांनी केले होते 18 ते 25 वयोगटातील युवावर्गाला दररोजच्या आहारात जेवढे उष्मांक घेणे आवश्यक असते त्यापेक्षा बाराशे पेक्षा कमी उष्मांकचा आहार ही पिढी वजन कमी करण्याच्या नादात घेत होती असेही लक्षात आले.

आहाराच्या आदर्श नियोजनाप्रमाणे महिलांना दररोज २००० उष्मांकाचा आहार आणि पुरुषांना दररोज अडीच हजार उष्मांकाचा आहार घेणे योग्य मानले जाते तज्ज्ञांच्या मते तुम्हाला आहाराचे नियोजन करून वजन कमी करायचे असेल तर फक्त 10 ते 20 टक्के उष्मांक कमी करून तुम्ही वजन कमी करू शकता यापेकशा जास्त उष्मांक कमी करून वजन कमी होते पण शरीराचे पोषण होत नाही असा सावधगिरीचा इशाराही तज्ञांनी दिला आहे अशा प्रकारे कमी उष्मांकचा आहार घेतल्यामुळे आळस येणे थकवा जाणवणे केस गळणे आधी परिणाम दिसून येतात समाज माध्यमांचा विविध व्यासपीठांवर क्रॅश डायटिंग ला प्राधान्य दिले जात असल्यामुळे तरुण पिढी त्याकडे आकर्षित होत असल्याची माहिती या संशोधनात समोर अली आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top