Jyotiba Yatra 2026 चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्त दख्खनचे राजा ज्योतिबा यांच्या मंदिरात आज मुख्य दिनोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या पवित्र दिवशी केदारलिंग येथे पारंपरिक पद्धतीने सालंकी पूजा पार पडली असून मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेला आहे.
पहाटेपासूनच विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली. सकाळी ५ ते ६ या वेळेत शासकीय अभिषेक करण्यात आला. त्यानंतर ७ ते ८ या वेळेत सरदारी पूजा विधीपूर्वक संपन्न झाली. सकाळी साडेदहा ते दुपारी बारा या वेळेत धूप आरती पार पडली, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले.
दुपारी एकच्या सुमारास देवाच्या सासन गाठीच्या क्रमांकांची पूजा शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. या पूजेनंतर यात्रेतील पुढील कार्यक्रमांना औपचारिक सुरुवात झाली. संपूर्ण दिवसभर मंदिर परिसरात धार्मिक वातावरण अनुभवायला मिळत आहे.
संध्याकाळी ५ वाजता पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला असून साडेपाच वाजता तोफेची सलामी दिली जाणार आहे. सायंकाळी ५ वाजून ३४ मिनिटांनी पालखी एमआयकडे प्रस्थान करणार आहे. या सोहळ्यासाठी भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.
यात्रेदरम्यान मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करण्यात येत असून, संपूर्ण परिसर गुलाबी रंगाने न्हाऊन निघाला आहे. "चांगभलं"च्या गजराने वातावरण भक्तिमय झाले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही Jyotiba Yatra 2026 मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. पारंपरिक विधी, धार्मिक उत्साह आणि भक्तांची उपस्थिती यामुळे हा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरत आहे.

