Sunday, 24 Jan, 10.41 am ई-चावडी

होम
चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट; धक्कादायक माहितीचा उलगडा

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांवरून दिल्लीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशात एक धक्कादायक बातमी समोर आली असून चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याचं समोर आलं आहे. आंदोलक शेतकऱ्यांकडून प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीची तयारी सुरू असताना हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीने हत्येच्या कटाची कबूलीही दिली आहे.

शुक्रवारी रात्री आंदोलक शेतकऱ्यांनी एका चेहरा झाकलेल्या व्यक्तीला माध्यमांसमोर उभं केलं. त्यानंतर या व्यक्तीनं चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट होता. शेतकरी नेत्यांनी आरोपीला आंदोलनस्थळी पकडलं.

Top