Friday, 22 Jan, 9.12 pm ई-चावडी

होम
IPL 2021 : चेन्नईकडून खेळणार राजस्थानचा हा स्टार खेळाडू

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू आता चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार आहे. गेल्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळलेला अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पाला चेन्नई सुपर किंग्जने करारबद्ध केले आहे. यंदाच्या स्पर्धेत उथप्पा राजस्थानऐवजी चेन्नईकडून खेळताना दिसणार आहे.

Thank you for your time in pink, Robbie. 💗

Sending good wishes (and whistles) your way. 💛#HallaBol | #RoyalsFamily | @robbieuthappa pic.twitter.com/5U4dXXhhCI

- Rajasthan Royals (@rajasthanroyals)

मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, पुणे वॉरियर्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळलेला उथप्पा नव्या मोसमात चेन्नईच्या संघात खेळेल. या फलंदाजाने चेन्नई संघात सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि राजस्थानबरोबर घालवलेला क्षणही आठवला. तो म्हणाला की, राजस्थान रॉयल्सबरोबर माझे वर्ष खरोखरच आनंदी गेले. या फ्रँचायझी संघात येतांना मला खूप आनंद झाला. आता २०२१ मध्ये चेन्नईबरोबर माझा क्रिकेट प्रवास सुरू करण्यास मी उत्साही आहे.

Robin is our newest Bat-Man! Welcoming you with #Yellove Vanakkam @robbieuthappa! #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/MYVpwvV2ZG

- Chennai Super Kings (@ChennaiIPL)

२०२०च्या लिलावादरम्यान उथप्पाला राजस्थान संघाने विकत घेतले आणि त्याचा संघात समावेश करण्यात आला. या हंगामात तो 12 सामने खेळल्यानंतर केवळ 196 धावा करू शकला. हा तिसरा हंगाम होता जेव्हा त्याने एकही अर्धशतक केले नाही. गतवर्षीच्या आयपीएलमध्ये राजस्थान संघाने 14 सामन्यांत फक्त 12 गुण मिळवले. राजस्थान रॉयल्सच्या वतीने जेक लूश म्हणाले की, रॉबीने आपल्या संघात केलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्याचे आभार मानू इच्छितो.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: E-Chawadi
Top