Thursday, 01 Oct, 8.41 pm ई-चावडी

होम
खुशखबर! डीएड, बीएड शिक्षकांसाठी सरकारी नोकरी; तब्बल 2966 पदे भरणार

नवी दिल्ली : डीएड, बीएड पदवीधारक शेकडो शिक्षक आहेत त्यांना अद्याप नोकरी नाही. पण आता या सर्वांची प्रतिक्षा संपणार आहे. कारण सर्व शिक्षा अभियान, आसाम (SSA Assam) या योजनेंतर्गत प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळेमध्ये TET पात्र शिक्षकांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. तब्बल 2966 पदे भरली जाणार आहे.

सर्व शिक्षा अभियान, आसाम येथील भरतीची ही प्रक्रिया कॉन्ट्रॅक्टच्या आधारे केली जाणार आहे. भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 27 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 11 ऑक्टोबर 2020 आहे. उमेदवार येथे रिक्त जागा तपासू शकतात.

इच्छुक उमेदवार सर्व शिक्षा अभियान, आसामच्या अधिकृत संकेतस्थळावर ssa.assam.gov.in जाऊन अर्ज करू शकतात.

लोअर प्रायमरी (प्राथमिक शाळा) :

पद - 2966

पात्रता - उच्च माध्यमिक, पदवी एलपी टीईटी आणि डिप्लोमा, बीएलईडी डिप्लोमा (विशेष शिक्षण) बीएड.

अप्पर प्रायमरी किंवा उच्च प्राथमिक सामाजिक विज्ञान शिक्षकांची भरती :

रिक्त पदे - 548

पात्रता - आसाम टीईटी उत्तर प्रदेश आणि डिप्लोमा / बीएड / बीएड (विशेष शिक्षण)

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: E-Chawadi
Top