Sunday, 25 Oct, 7.01 pm ई-चावडी

होम
कोरोनाचा केसांवरही होतोय गंभीर परिणाम; तज्ज्ञांनी केला खुलासा

सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा आरोग्यावर तर परिणाम होतोच पण आता तज्ज्ञांनी एक मोठा खुलासा केला आहे. कोरोनाचा केसांवरती गंभीर परिणाम होत असल्याचा दावा तज्ज्ञांनी संशोधनातून केला आहे.

या अभ्यासासाठी अमेरिकेतील इंडियन युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक, डॉक्टर नताली यांच्या टीमने जवळपास 1500 लोकांवर सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात सहभागी असलेल्या दीर्घकाळ कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला होता. कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतरही अनेकांना केस गळण्याची समस्या उद्भवली होती.

केस गळणं हे कोरोनाच्या 25 लक्षणांपैकी एक आहे. सर्वेक्षणात सहभाग असलेल्या लोकांनी सर्दी, उलट्या होणं यासह केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागला. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या व्हायरसचं संक्रमण आणि केस गळणं यामधील सगळ्यात महत्वाचे कारण ताण तणाव आहे. कोणत्याही आजाराचा जास्त ताण घेतल्याने केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे.

कोरोनामुळे केस गळणे हे केवळ तात्पुरत्या स्वरुपात असू शकते. यावेळी, रुग्णाने आपला ताण कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या व्यतिरिक्त आपला आहार सर्वात महत्त्वाचा आहे. यादरम्यान, व्हिटॅमिन-डी आणि आयर्न युक्त, पौष्टिक घटक असलेले आरोग्यदायी अन्न आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम आहे. यातून मिळणारी रोग प्रतिकारशक्तीच आपल्याला या विषाणूशी लढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: E-Chawadi
Top