Wednesday, 23 Sep, 5.33 pm ई-चावडी

होम
सुशांतला न्याय मिळो वा ना मिळो, पण DGP गुप्तेश्वर यांना तिकीट नक्की मिळणार : सपा नेते

नवी दिल्ली : बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेय यांनी स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेतली. बिहार सरकारने त्यांच्या व्हीआरएसला मंजूरी दिली. मात्र, आता ते बिहार विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत.

सुशान्त सिंह राजपूत को बिहार पुलिस और सीबीआई से जस्टिस मिले न मिले लेकिन बिहार के डीजीपी गुप्तेश्वर जी को JDU से टिकट जरूर मिल जाएगा? एक बार फिर नौकरी छोड़कर अब वह चुनाव लड़ेंगे। मतलब सारी TRP चुनाव के लिए! ताबूत में दलाली खाने वालों ने सुशांत की मौत का भी सौदा कर लिया। शर्मनाक!

- Sunil Singh Yadav (@sunilyadv_unnao)

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात गुप्तेश्वर यांनी बिहार सरकारच्या वतीने आपली बाजू आक्रमकपणे मांडली. गुप्तेश्वर पांडेय यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर सातत्याने टीका केली. त्यामुळे ते बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते सुनील सिंह यादव यांनी ट्विट करत गुप्तेश्वर पांडेय आणि जेडीयू यांची एकप्रकारची खेळी असल्याचे सांगितले.

सुनील यादव यांनी ट्विट करत म्हटले, की सुशांत सिंह राजपूतला बिहार पोलिस आणि सीबीआयकडून न्याय मिळो ना मिळो पण बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर यांना जेडीयूकडून तिकीट नक्की मिळेल? ते पुन्हा एकदा नोकरी सोडून निवडणूक लढविणार आहेत. म्हणजेच ही सगळी प्रसिद्धी निवडणुकीसाठीच. सुशांतच्य मृत्यूचा एकप्रकारे सौदाच केला. हे अत्यंत लाजीरवाणी.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: E-Chawadi
Top