मुख्य पेज
नावे बदलण्याच्या धुंदीत भाजपने भारतरत्न मिळालेल्या महापुरुषांचा अवमान केला;राष्ट्रवादीची टिका

टीम ई-लोकमान्य | मुंबई- गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बांधण्यात आले आहे, ही सुखद बाब आहे.मात्र,त्याचे नामांतर करुन आता या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे,ही दुःखद बाब आहे. हे स्टेडियम पूर्वी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने ओळखले जात होते.आजवर भाजप सरदार पटेल यांच्या नावाने मते मागत होते आणि आज त्यांचे नाव बदलून खुद्द मोदीजींचे नाव स्टेडियमला देण्यात आले आहे.
तरिही मोदीजी शांत आहेत, याचा अर्थ नामांतराला मोदीजींचा देखील पाठिंबा असल्याचे सिद्ध होते.नावे बदलण्याच्या धुंदीत भारतरत्न मिळालेल्या महापुरुषांचा अवमान भाजपकडून करण्यात येत आहे, अशी टीका अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की,या आधी देखील हरयाणा राज्यात एका रुग्णालयाला दिलेले भारतरत्न सरहदी गांधी यांचे नाव बदलून स्व.अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले होते.आता सरदार पटेल यांचे नाव बदलून मोदीजींचे नाव ठेवले जात आहे. आतापर्यंत शहरांची नावे बदलली जात होती.मात्र आता भारतरत्नांच्या नावाने असणारी रुग्णालये,स्टेडियम यांची देखील नावे बदलण्यात येत आहेत,असेही नवाब मलिक यांनी निदर्शनास आणले.