Sunday, 21 Feb, 12.59 am गणेशा स्पीक्स

साप्ताहिक
धनू

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात एखादे मोठे काम हाती घेतल्यास ते पूर्णत्वास जाण्याची शक्यता धूसर असल्याने ते घेणे टाळावे. आपणास आपल्या मनातील गोंधळास सामोरे जावे लागेल, ज्यातून बाहेर पडण्यास आपल्याला खूप वेळ लागण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरवातीस खर्चात वाढ होईल, मात्र हळू हळू परिस्थिती आपल्या नियंत्रणात येईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या कामात व्यस्त राहाल. व्यापाऱ्यांना आपल्या कष्टाचे यथोचित फळ मिळेल व त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आपणास जोडीदारासह बाहेर फिरावयास जाण्याची संधी मिळेल. प्रेमीजन आपल्या प्रियव्यक्तीची ओळख आपल्या मित्रांना करून देऊ शकतील. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. ह्या आठवड्यात शक्यतो प्रवास टाळावेत.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Ganesha Speaks Marathi
Top