Sunday, 28 Feb, 12.59 am गणेशा स्पीक्स

साप्ताहिक
कन्या

हा आठवडा आपल्यासाठी उत्तम असून सुरवातीपासूनच आपण उत्साहित दिसाल व त्यामुळे प्रत्येक कामात आपणास यश प्राप्त होईल. आपण स्वतः आनंदित व्हालच शिवाय इतरांना सुद्धा त्यात सहभागी करण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक जीवनात खूपच आनंद पसरेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा उत्तम आहे. कुटुंबियांचे सुद्धा आपणास सहकार्य मिळेल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. प्रवासाची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांचा गुंता काही अंशी उलगडू शकेल. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा उत्तम आहे. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. आपण त्यामुळे चिंतीत होऊ शकता. आपली प्रकृती मात्र आता बऱ्याच अंशी सुधारू लागेल. जीवनाचा आनंद आपण उपभोगू शकाल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Ganesha Speaks Marathi
Top