Sunday, 28 Feb, 12.59 am गणेशा स्पीक्स

साप्ताहिक
कर्क

आठवड्याच्या सुरवातीस नाते संबंधांमुळे आनंदाचे व जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण होईल. आपण आपल्या कुटुंबियांच्या सहवासात आनंदात वेळ घालवू शकाल. प्रणयी जीवनात सकारात्मक प्रगती होईल. आपल्या प्रेमाकर्षणात कोणत्याही प्रकारे अडथळे निर्माण होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. ह्या आठवड्यात कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर व शासकीय बाबीत आपले तर्क व संवादाच्या आधारे समाधान प्राप्त करू शकाल. आपल्या संवाद कौशल्याने आपल्या व्यावसायिक जीवनात चांगल्या परिणामांची अपेक्षा आपण बाळगू शकता. ह्या दरम्यान आपणास वाईट संगती पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्या आठवड्यात आपल्या अनुभवाच्या जोरावर यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आठवड्याच्या मध्या पर्यंत विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता होऊ शकेल व ते आपल्या निर्धारित लक्ष्यांकाच्या जवळपास जाऊन पोचू शकतील. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत सकारात्मक सुधारणा होताना दिसून येईल.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Ganesha Speaks Marathi
Top