Sunday, 28 Feb, 12.59 am गणेशा स्पीक्स

साप्ताहिक
मकर

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस काही चिंता आपणास सतावतील, मात्र आपण जर पूर्ण आत्मविश्वासाने कार्य केलेत तर चांगला परिणाम मिळवू शकाल. कामाच्या बाबतीत आपण आपल्या लक्ष्यांकावर नजर ठेवून असाल. नोकरीत कष्टाचा पूर्ण फायदा होईल. आपण आपल्या कामाचा आनंद घेऊ शकाल. व्यापारात सुद्धा वृद्धी होईल. आपला व्यावसायिक भागीदार आपल्या खांद्यास खांदा देऊन आपले समर्थन करेल. वैवाहिक जोवनात आनंद पसरेल. प्रेमीजनांसाठी मात्र हा आठवडा काहीसा त्रासदायी आहे. एकमेकांप्रती कटुता वाढू शकते. अशा परिस्थितीत आपणास शांत राहून धीराने पुढे जावे लागेल. आवश्यकता भासल्यास एखाद्या त्रयस्थाची मदत घेऊन आपले प्रणयी जीवन पूर्ववत करावे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Ganesha Speaks Marathi
Top