Sunday, 28 Feb, 12.59 am गणेशा स्पीक्स

साप्ताहिक
मेष

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी असल्याने आव्हानांना घाबरून न जाता आपले कार्य चालूच ठेवा. आपल्या कुटुंबात सुख - शांती नांदेल. प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी आपणास थोडे प्रयत्न करावे लागतील. आपल्या प्रियव्यक्तीस एखादी भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करावे. नोकरी करणाऱ्यांना कामात यश प्राप्त होईल, मात्र कार्यालयातील एखाद्या व्यक्तीशी वाद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. व्यापारी वर्गास ह्या आठवड्यात चांगला फायदा झाल्याने ते आनंदित होतील. कुटुंबातील एखाद्या जुन्या संपत्ती विषयी विचार - विमर्श होईल. विद्यार्थ्यांचा कल फाईन आर्टस् ह्या विषयाकडे होईल. व त्यामुळे आपले छंद जोपासण्याची त्यांना संधी मिळेल. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा काहीसा नाजूक आहे. आपल्या आहाराकडे तसेच डोळ्यांकडे विशेष लक्ष द्यावे.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Ganesha Speaks Marathi
Top