Sunday, 21 Feb, 12.59 am गणेशा स्पीक्स

साप्ताहिक
सिंह

आठवड्याची सुरवात आपल्यासाठी चांगलीच होईल. आपण कामात व्यस्त राहाल. आपण कुटुंबियांना तसेच नोकरी - व्यवसायास सुद्धा वेळ देऊ शकाल. व्यापारीवर्गास फायदेकारक सौदे झाल्याने कामाचा आनंद घेता येईल. आठवड्याच्या सुरवातीस नोकरी करणाऱ्या जातकांचे एखाद्याशी वाद होण्याची शक्यता असल्याने त्यांना नोकरीच्या ठिकाणी काळजी घ्यावी लागेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात जवळीक वाढली तरी काही कारणाने मतभेद होण्याची सुद्धा शक्यता आहे. प्रेमीजनांना थोडा धीर धरावा लागेल. आपल्या संततीस एखादा चांगला फायदा संभवतो. अभ्यासात चांगली प्रगती होईल. एखाद्या स्पर्धा परीक्षेसाठी आपली निवड होऊ शकते. आरोग्याची मात्र काळजी घ्यावी.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Ganesha Speaks Marathi
Top