Sunday, 28 Feb, 12.59 am गणेशा स्पीक्स

साप्ताहिक
तुळ

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या खर्चात अचानकपणे वाढ होईल, व आपणास त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आठवड्याच्या मध्यास परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. आपला आत्मविश्वास वाढेल व त्यामुळे आपणास प्रत्येक कार्यात यश प्राप्त होईल. आठवड्याच्या अखेरीस आपणास कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. ह्या दरम्यान आपणास आर्थिक चिंता सतावतील. आपले आरोग्य चांगले राहिले तरी खाण्या - पिण्यातील असमतोलपणामुळे काही त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरणात आनंद पसरेल. आपण आपल्या जुन्या पिढीतील लोकांना भेटून आनंदित व्हाल , तसेच त्यांच्याकडून बरेच काही शिकून घ्याल. वैवाहिक जीवनातील गोडवा टिकून राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या घरात एखाद्या पूजेचे आयोजन करू शकाल. हा आठवडा प्रवासासाठी प्रतिकूल आहे.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Ganesha Speaks Marathi
Top