Sunday, 28 Feb, 12.59 am गणेशा स्पीक्स

साप्ताहिक
वृषभ

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपण मानसिक दृष्ट्या बेचैन व्हाल. ग्रहस्थितीमुळे आपण आतूनच त्रस्त व्हाल. वैवाहिक जीवनात तणावाची स्थिती निर्माण होईल. आपल्या वागणुकीमुळे तणाव वाढेल. आपले आरोग्य नाजूक राहील. आपणास लहान - सहान फोड किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आपले प्रणयी जीवन सुखद असेल. आपल्या प्रियव्यक्तीसह एखाद्या रमणीय ठिकाणी आपण फिरावयास जाऊ शकाल. नोकरीत चांगली कामगिरी होईल. आपणास नशिबाची साथ मिळणार असल्याने आपले कार्य चालूच ठेवा. व्यापाराच्या बाबतीत आपली स्वतःची विचारसरणी असेल कि जी आपल्या भागीदारास कदाचित पसंत पडणार नाही. त्यामुळे आपल्या दोघात काही मतभेद होण्याची शक्यता आहे. आपले व्यावसायिक नुकसान होऊ नये म्हणून हि परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Ganesha Speaks Marathi
Top