Sunday, 21 Feb, 12.59 am गणेशा स्पीक्स

साप्ताहिक
वृश्चिक

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपण आपल्या व्यापारावर लक्ष द्याल, परंतु ह्या दरम्यान कोणताही मोठा सौदा करू नये. त्यासाठी थोडे थांबावे. आठवड्याच्या मध्यास आपल्या कुटुंबियांसह मौज - मजा करण्यात वेळ घालवू शकाल. एकमेकांशी संवाद साधून आपणास बरे वाटेल. आठवड्याच्या अखेरीस आपणास नशिबाची साथ मिळाल्याने आपली बरीचशी कामे सहजपणे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूपच चांगला असून आपण कामाचा आनंद घेऊ शकाल. वैवाहिक जीवन मात्र तणावपूर्ण राहील. आपण आपल्या जोडीदाराचा विश्वास संपादन केलात तरच नाते संबंधात गोडवा निर्माण होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्य फलदायी आहे. आपण आपल्या प्रियव्यक्तीच्या सहवासात चांगला वेळ घालवू शकाल. आपले आरोग्य सामान्यच राहील.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Ganesha Speaks Marathi
Top