Thursday, 29 Oct, 12.41 pm GLOBAL NEWS मराठी

होम
आशादायी : कोरोना लस संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा

आशादायी : कोरोना लस संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा

कोविड १९ संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखती दरम्यान मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा कोरोना प्रतिबंधात्मक लसीसंदर्भात आहे. जेव्हा कधी लस येईल ती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाईल. सध्याच्या बदलत्या स्थितीतही जगभरात 'न्यू इंडीया' व्हिजनची संकल्पना देशासमोर ठेवली. द इकोनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीकाकारांच्या प्रश्नांना यावेळी उत्तर दिले. सरकारला केवळ विरोध करायचाय ते काहीही बोलत राहतात. वॅक्सीन जेव्हा येईल तेव्हा प्रत्येकाला दिली जाईल असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

कोरोनाच्या संसर्गाच्या सर्वाधिक जवळ असलेल्यांना लसीकरणात प्राधान्य दिले जाईल. कोरोना युद्ध समोरुन लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांना दिले जाईल. नॅशनल एक्सपर्ट ग्रुप वॅक्सीन बनवण्याचे काम करत आहेत. आता देखील वॅक्सीन बनवण्याची प्रक्रीया सुरु आहे, ट्रायल सुरु असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

यावेळी अर्थव्यवस्था संदर्भात बोलताना मोदी म्हणाले की, भारतातील शेती, एफडीआय, मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये वेग आणि गाड्यांच्या विक्रीत उसळी आली आहे. ईपीएफओमध्ये जास्त लोक जोडली जाणं हे नोकरीधंद्याचा वेग वाढल्याचे दाखवत असल्याच चित्र आहे. भारताची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. शेती आणि उद्योग क्षेत्रात सुधार येणे ही जागतिक गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी आहे. नवा उद्योग कायदा हा उत्पादक आणि कामगारांसाठी कसा फायदेशीर आहे ? हे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Global News Marathi
Top