Thursday, 29 Jul, 7.38 pm Goa Khabar

होम
भारतात कोविड - 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला

  • गेल्या 24 तासात 43 लाखांपेक्षा अधिक लसीकरणाच्या मात्रा देण्यात आल्या
  • रुग्ण बरे होण्याचा दर 97.38 %
  • गेल्या 24 तासात 43,509 नवीन दैनंदिन रुग्णांची नोंद
  • भारतात सध्या उपचाराधीन रुग्ण (4,03,840), एकूण रुग्णांच्या 1.28%
  • दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.52%), सलग 52 व्या दिवशी हा दर 5%पेक्षा कमी

गोवा खबर : भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने काल 45 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार, एकूण 54,11,501 सत्रांमध्ये 45,07,06,257 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 43,92,697 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
यामध्ये समाविष्ट -

HCWs 1st Dose 1,02,96,166
2nd Dose 77,71,787
FLWs 1st Dose 1,79,14,176
2nd Dose 1,10,81,579
Age Group 18-44 years 1st Dose 14,68,84,314
2nd Dose 72,09,744
Age Group 45-59 years 1st Dose 10,30,99,861
2nd Dose 3,68,42,675
Over 60 years 1st Dose 7,43,50,754
2nd Dose 3,52,55,201
Total 45,07,06,257

21 जून 2021 पासून कोविड - 19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा सुरू झाला आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.
महामारीच्या प्रारंभीच्या काळापासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,07,01,612 जण पूर्वीच बरे झाले आहेत आणि 38,465 रुग्ण गेल्या 24 तासात बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 97.38 %

इतका आहे.

गेल्या 24 तासात 43,509 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे.
सलग 32 दिवस 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या आज 4,03,840 आहे आणि देशातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या ती 1.28% इतकी आहे.

चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ करीत, देशभरात गेल्या 24 तासात 17,28,795 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत भारताने 46 कोटींपेक्षा अधिक (46,26,29,773) चाचण्या केल्या आहेत.
एकीकडे देशभरात चाचणी क्षमतेत वाढ करण्यात आली आहे, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.38% आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज 2.52% आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सलग 52 व्या दिवशी 5% पेक्षा कमी आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Goa Khabar Marathi
Top