Friday, 30 Jul, 8.05 pm Goa Khabar

होम
जि.प.चे माजी उमेदवार व सांताक्रूझ मधील सामाजिक कार्यकर्ते सुदेश कळंगुटकर आपमध्ये सामील

गोवा खबर : गुरूवारी प्रख्यात व्यापारी तसेच राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते सुदेश कळंगुटकर यांच्या प्रवेशानंतर आपची स्थान मजबूत झाले आहे. कळंगुटकर हे चिंबल मतदारसंघातील माजी जि.प. उमेदवार आणि सांताक्रूझ मतदारसंघाचे माजी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष असून त्यांनी दोन दशकांपासून वेगवेगळ्या क्षमतेत पक्षासाठी काम केले.

कळंगुटकर यांनी दोनदा जिल्हा परिषद निवडणूक लढविली, २०१५ मध्ये त्यांना अपक्ष म्हणून ४६०८ मते मिळाली आणि त्यानंतर २०२० मध्ये त्यांना कांग्रेसच्या तिकिटावर २३७१ मते मिळाली.

वाहतूक क्षेत्रात व्यवसाय असण्याव्यतिरिक्त,कळंगुटकर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात खूप सक्रिय आहेत. ते मार्शेस मंच वेलफेअर असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, सिद्धनाथ कला मंचचे विद्यमान अध्यक्ष,सत्तरी देवालय सौष्ठानचे विद्यमान अध्यक्ष आणि लोकप्रिय मार्शेस क्लबचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

कळंगुटकर म्हणाले की, गोव्यातील सामान्य माणूस सत्ताधारी पक्षाने पूर्णपणे दडपून टाकला होता. ते म्हणाले की,आपच्या विशेषत: २४/७ वीज ठराविक वेळेत पुरवण्याच्या दिलेल्या आश्वासनामुळे ते प्रभावित झाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी हे अधोरेखित केले की, शेतकऱ्यांसारखे सामान्य गोयंकरांनी स्वतःचा बचाव करणे पूर्णपणे सोडले आहे आणि आपने वचन दिलेले मोफत ३०० युनिट वीज ही गोंयकरांसाठी जीवनरेखा ठरेल. "आपच्या कामावर आधारित राजकारणामुळे मी खूप प्रभावित झालो. पहिल्यांदा आम्ही गोव्यामध्ये मूलभूत मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे पाहिले. आम आदमी पार्टीच्या ऊर्जामंत्र्यांनी दोन वर्षांत ३०० युनिट वीजच नाही, तर शून्य वीज कपात करण्याचे आश्वासन दिले. भाजप आणि कांग्रेस या सर्व वर्षांमध्ये हे प्रदान करण्यास अपेशी ठरले" सुदेश कळंगुटकर म्हणाले. "माझे संपूर्ण कुटुंब हे शेतकर्‍यांचे कुटुंब आहे, आज शेतकरी भाजप सरकारच्या सत्तेत आपली जमीन गमावत आहेत. बऱ्याच इमारती, प्रचंड मोठी बांधकामे तसेच सरकारी कार्यालये, हे सर्व काही शेताच्या खर्चावर बनले आहे आणि आता शेतकऱ्यांना आहेत त्या संकटांतून बाहेर पडण्यासाठी सरकारतर्फे कोणताही आधार नाही, हे बरोबर आहे का? "कळंगुटकर यांनी विचारले. "गोव्याच्या जनतेने आपला संधी दिली पाहिजे,हा एकमेव पक्ष आहे,जो त्यांच्या आश्वासनांसाठी एक टाइमलाइन देण्यास तयार आहेत, आणि ज्यांच्यावर लोकांशी एकनिष्ठ राहण्यासाठी आणि त्यांचे वचन पाळण्यासाठी विश्वास ठेवला जाऊ शकतो. 'कळंगुटकर म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Goa Khabar Marathi
Top