Friday, 22 Jan, 4.27 pm Goa Khabar

होम
कुठली तरी गोष्ट महिलांना पुढल्या पिढीला समर्थन देण्यापासून मागे ओढत राहातेः झट आयी बसंत दिग्दर्शक

गोवा खबर : 'झट आयी बसंत'(लवकर आला वसंत) मध्ये सोनिया आणि अनू या दोन मुलींची कहाणी आहे ज्या मुलींची सामाजिक- सांस्कृतिक परिस्थिती परस्परविरोधी आहे. मात्र, तरीही या दोन्ही मुलींची कहाणी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पितृसत्ताक स्थितीशी संबंधित आहे. पितृसत्ताक समाजातील रिवाज कशा प्रकारे महिलांकडून पुढे नेले जातात, मातांकडून कन्यांकडे, जाणते किंवा अजाणतेपणे ते सुरू राहातात, याचे चित्रिकरण या चित्रपटात आहे. "असे काही तरी आहे जे आधीच्या पिढीतील महिलांना पुढच्या पिढीचे समर्थन करण्यापासून परावृत्त करत राहाते." युवा चित्रपट निर्माती प्रमाती आनंद यांनी ही भावना 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये 21 जानेवारी 2021 रोजी आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत व्यक्त केली.

आपल्या मर्जीने आयुष्य जगण्याची इच्छा असलेल्या तरुण महिलांचा आधुनिक काळातील लढा आणि त्यांच्या इच्छा आकांक्षांचा त्यांच्या मातांसोबतच्या नात्यावर झालेला परिणाम या चित्रपटात पाहायला मिळतो. हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देणाऱ्या पहाडी लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा वेध यामध्ये घेण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातील कांडबरी येथे या चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले आणि सोनियाची भूमिका तिकडच्या एका स्थानिक मुलीने साकारली आहे. " या भूमिकेत तिने स्वतःचीच भूमिका केली आहे." शहरातील असलेल्या अनु या मुलीची भूमिका एनएसडी या संस्थेतून पदवी मिळवलेल्या अभिनेत्रीने आणि आई सीमा ही भूमिका देखील व्यावसायिक अभिनेत्रीने केली आहे. या चित्रपटात नायिकांच्या आयुष्यावर होणारा पर्यावरणाचा संबंध उलगडून दाखवला आहे. त्यामुळेच या चित्रपटाचे नाव 'झट आयी बसंत'(लवकर आला वसंत) असे आहे. ज्यावेळी आपल्या आयुष्यात वसंत लवकर येतो आणि निसर्ग देखील, त्यावेळी तो आपल्या परीने काही तरी विपरित करतो. या चित्रपटात देखील पावसा अभावी गव्हाच्या पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव झाल्याचे दाखवण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Goa Khabar Marathi
Top