Thursday, 29 Jul, 7.45 pm Goa Khabar

होम
राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध

गोवा खबर : कोविड - 19 प्रतिबंधक लसीकरणाची व्याप्ती आणि गती देशभरात वाढविण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. कोविड - 19 प्रतिबंधक सार्वत्रिक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून प्रारंभ झाला. लसींची अधिक प्रमाणातील उपलब्धता, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरकणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टीने लस उपलब्धतेवर यापूर्वीपासून लक्ष ठेवून आणि प्रवाही लस पुरवठा साखळी या माध्यमातून लसीकरण अभियानाला अधिक गती देण्यात आली आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा मोफत पुरवित आहे. कोविड - 19 लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्प्यात केंद्र सरकार, देशातील लस उत्पादकांकडून उत्पादन केलेल्या 75% लसी खरेदी करून त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरविणार आहे.

VACCINE DOSES

(As on 29 July 2021)

SUPPLIED

47,48,77,490

IN PIPELINE

53,05,260

CONSUMPTION

44,74,97,240

BALANCE AVAILABLE

2,88,55,050

सर्व स्रोतांच्या माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत 47.48 कोटींपेक्षा जास्त (47,48,77,490) लसींच्या मात्रा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना पुरविल्या आहेत आणि आणखी 53,05,260 मात्रा पुरवठ्याच्या मार्गावर आहेत.

आज सकाळी आठ वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 44,74,97,240 मात्रा देण्यात आल्या आहेत.

याशिवाय लसीच्या 2.88 कोटीपेक्षा जास्त (2,88,55,050) शिल्लक आणि न वापरलेल्या मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Goa Khabar Marathi
Top