Wednesday, 20 Jan, 8.35 pm Goa Khabar

होम
सरफरोश-2 चित्रपटाची ही पाचवी पटकथा : जॉन मॅथ्यू मथान

गोवा खबर : "मी माझ्या चित्रपटाच्या आशयाच्या शोधात संपूर्ण भारत फिरलो आहे. कोणत्याही चित्रपट निर्मात्यासाठी सामाजिक आणि राजकीय मुद्दे समजून घेणे महत्वाचे आहे. मला वाटते लेखक किंवा दिग्दर्शकाने समाजाप्रती संवेदनशील असले पाहिजेत. कोणाच्याही भावना न दुखावता आपल्याला आपला मुद्दा मांडता आला पाहिजे." हे उद्गार आहेत 51 व्या इफ्फी भारतीय पॅनोरामा ज्यूरी आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त चित्रपटाचे लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मॅथन यांचे. गोवा येथे आयोजित केलेल्या 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील "DO YOU HAVE IT?" या शिर्षका अंतर्गत आयोजित केलेल्या आभासी संवाद सत्रात ते चित्रपट पत्रकार फरदीन शहरीयार यांच्याशी संवाद साधत होते.

मथान यांना त्यांनी दिग्दर्शित आणि निर्मिती केलेल्या 'सरफरोश' (1999) या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे, या चित्रपटाची कथा-पटकथा दोन्ही मथान यांनी लिहिली आहे. " "चित्रपटातील गाणी ही त्या चित्रपटाच्या कथेला पूरक असली पाहिजेत. ज्या वेळी या चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा कमाईच्या दृष्टीने संगीत हा या चित्रपटाचा एक मोठा घटक होता. या चित्रपटात दोन रोमँटिक गाणी करण्याची चित्रित करण्याची कल्पना मला आवडली नव्हती", असे मथान यांनी सरफरोश चित्रपटा विषयी सांगितले.

या संदर्भात ते म्हणाले की, "एखाद्या चित्रपटात रोमँटिक गाणी ठेवण्यासाठी आता चित्रपट निर्मात्यावर सक्ती केली जात नाही, चित्रपटाच्या व्यवसायासाठी आता याची आवश्यकता नाही"

"मी सरफरोश 2 ची पटकथा अंतिम करण्यापूर्वी ती अंदाजे 5 ते 6 वेळा लिहिली. सरफरोश-2 ची ही प्रत्यक्षातली पाचवी पटकथा आहे ज्यावर आता चित्रपटाची निर्मिती केली जाईल " सरफरोश 2 च्या पटकथा लेखन प्रक्रियेवर प्रकाश टाकताना मथान यांनी ही माहिती दिली.

सरफरोश 2 बद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले की, हा चित्रपट भारताच्या अंतर्गत सुरक्षेबाबत आहे. "विविध समस्या असताना देखील भारताची अंतर्गत सुरक्षा किती मजबूत आहे हे यातून दाखविले जाईल." या समस्या झेलणाऱ्या सीआरपीएफ कर्मचार्‍यांना हा चित्रपट समर्पित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय पॅनारोमाचे ज्युरी-अध्यक्ष म्हणून काम करताना आलेल्या आपल्या अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणले की, "मी 180 चित्रपट पाहिले आणि माझ्या लक्षात आले कि आपण किती वैविध्यपूर्ण आहोत." ते पुढे म्हणाले, भारत हा एक उत्साहपूर्ण सक्रिय लोकशाही असलेला देश आहे. "हा एक प्रेमळ देश आहे".

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Goa Khabar Marathi
Top