होम
'बीएचआर' घोटाळ्यात गिरीश महाजनांचा हात; पोलिसांकडे ढिगभर पुरावे?

जळगाव । BHR Scam बीएचआर पतसंस्था घोटाळ्यात जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी आता थेट माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांचे नाव घेतले आहे. आपल्याकडे याबाबत ढिगभर पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला. बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने जामनेर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर जामनेरात दाखल होताच पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर खुलासे केले आहेत.
गिरीश महाजन यांनी बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात थेट लाभार्थी दिसू नये म्हणून कार्यकर्त्यांच्या नावावर मालमत्ता घेतल्या. त्यानंतर त्या स्वत:सह पत्नी साधना महाजन यांच्या नावे करून घेतल्या. याबाबत आपल्याकडे ढिगभर पुरावे असून ते पुणे आर्थिक गुन्हे शाखेला दिल्याची माहिती पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यासंदर्भात पुरावे हवे असल्यास काही गट नंबर घेऊन जनतेने ऑनलाइन उतारे तपासून पहावे, त्यात सत्य बाहेर येईल, असे आवाहनही ललवाणी यांनी केले.
भाजप नेते गिरीश महाजन अडचणीत; पुण्यात अपहरण आणि खंडणीचा…
सत्तारांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी ; दानवेंवरील…
अण्णा प्लिज! शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करू नका!; गिरीष…
दरम्यान, आमदार गिरीश महाजन हे बीएचआरचे कर्जदार किंवा ठेवीदार नाहीत. त्यांचा या संस्थेशी कुठलाही संबंध नाही. त्यामुळे ललवाणी यांनी स्वत:ची पात्रता ओळखून आरोप करावेत. उगाच बिनबुडाचे आरोप करू नयेत, असे प्रत्युत्तर भाजपचे जामनेर तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी पारस ललवाणी यांना दिले आहे. बीएचआरच्या मालमत्ता ज्यांनी घेतल्या आहेत, त्यांची यादीच प्रसिद्ध झालेली आहे. ललवाणी यांनी चार वर्षानंतर आता उगाच जावईशोध लावू नये, असा टोलाही बाविस्कर यांनी लगावला.