Tuesday, 20 Apr, 8.25 pm HELLO महाराष्ट्र

होम
देशात लाॅकडाऊनची घोषणा होणार? पंतप्रधान मोदी 8 वाजून 45 मिनिटांनी साधणार जनतेशी संवाद

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने धुमाकुळ घातला आहे. राज्यासोबत देशातील कोरोना रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. यापार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 8:45 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत.

महाराष्ट्राचा छळ कशासाठी?? ; रेमडेसिविर वरून जितेंद्र आव्हाड…

संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हेच मोदींच्या…

विनाकारण फिरणाऱ्यांस पोलिस ठाण्याच्या आवारात क्वारंटाइन केले…

आज पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संवाद साधला होता. तसेच काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांनी संवाद साधला होता. आता यानंतर 8:45 वाजता जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशात लाॅकडाऊनची घोषणा तडकाफडकी घेतली जाणार नाही असे अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. मात्र आता मोदी कोणत्या योजनेची घोषणा करतात हे पहावं लागणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hello Maharashtra
Top