औरंगाबाद | रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची कोविड लक्षणे, रक्त चाचणी, ऑक्सिजन लेव्हल यावर रुग्णाची उपचाराची दिशा ठरते, अत्यंत गरज असल्यास सिटी स्कॅन चाचणी करावी, अशी महत्वपूर्ण सूचना केंद्रीय पथकाने दिली. शनिवारी केंद्रीय पथकाने महानगर पालिकेच्या मेलट्रॉन कोविड सेंटर येथे भेट दिली.
कोरोनावर नियंत्रणासाठी काटेकोर पालन करा; केंद्रीय पथकाच्या…
मेल्ट्रॉन, जिल्हा सामान्य रूग्णालय, घाटीला जिल्हाधिका-यांची…
केंद्रीय पथकाचा महापालिका कर्मचा-यांना दणका
यावेळी पथकाने येथील कामाची पद्धत, रुग्ण संख्या किती आहे, त्यांच्यावर केले जाणारे उपचार पद्धती याबद्दल पाहणी केली.
यावेळी केंद्रीय पथकात डॉ . दीपक भट्टाचार्य (फुफुस विकार तज्ज्ञ -सफदरगंज हॉस्पिटल नवी दिल्ली), डॉ . अभिजित पाखरे (भोपाळ) यांच्यासमवेत मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, मेलट्रॉन येथील आरोग्य अधिकारी वैशाली मुदखेडकर, मनपाचे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांची उपस्थिती होती.

