Sunday, 09 May, 7.35 pm HELLO महाराष्ट्र

महाराष्ट्र
जगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे; पत्नी अन् आईसोबतचा फोटो पोस्ट करत रोहित पवाराच्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आज सर्वत्र मातृदिन साजरा करण्यात आला. राजकीय व्यक्तींनीही आपल्या आईच्या आठवणी व तिच्यासोबत घालवलेल्या मायेच्या क्षणाचे फोटो मीडियावर शेअर केले असल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचे नातू राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या आई व पत्नीसोबतचा फोटो ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. जगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे असं म्हणत रोहित यांनी हटके स्टाईलमध्ये मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

'माझी आई आणि माझ्या मुलांची आई असलेली माझी पत्नी यांच्यासोबतच कोरोना रुग्णांची अहोरात्र काळजी घेणाऱ्या राज्यातील तमाम कोरोना वॉरियर्स माता आणि महिला भगिनींना मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! जगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे!,' अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ट्विटरवरून पवार यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत.

अजित पवारांनी कोणावर मेहेरबानी केली? टीका झाली नसती तर ६…

लसीकरणासाठी पैसे नाहीत म्हणणारे आता स्वतं:चं कौतुक…

मातृदिनादिवशी साजरे केले जाणारे कार्यक्रम यंदा मात्र कोरोनामुळे साजरे करता आले नाही. परंतु अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आईविषयी प्रेम व आठवणी व्यक्त केल्या. कुणी फेसबुक तर कुणी ट्विटरवरून आपल्या आईविषयी प्रेम व्यक्त केली. मात्र, बारामतीतील खासदार शरद पवार यांच्या घराण्यातील आमदार रोहित पवार यांनी आपल्या आई व पत्नी या दोघीसोबत काढलेले फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले. आणि त्यासोबत राज्यातील तमाम कोरोना वॉरियर्स माता आणि महिला भगिनींना मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

आमदार रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये आईविषयी मनात असलेल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. रोहित पवारांनी 'जगात आई आहे आणि आई आहे म्हणूनच जग आहे!,' असं म्हंटल आहे. आज अनेक राजकीय व्यक्तींनीही आपल्या आईसोबतच्या आठवणीना उजाळा दिला. आई व पत्नीसोबतच्या रोहित पवार यांनी ट्विटरवरून शेअर केलेल्या मातृदिनाच्या शुभेच्छाच्या फोटोची चर्चा सर्वत्र होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hello Maharashtra
Top