Thursday, 08 Apr, 1.57 pm HELLO महाराष्ट्र

होम
केंद्राय आरोग्य मंत्र्यांच्या त्या पत्रातून महाराष्ट्रविषयी द्वेष दिसतोय : जयंत पाटील

मुंबई : केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राला वाढत्या कोरोना संदर्भात चांगलेच फटकारले आहे. यावरूनच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या या पत्राबाबत चांगलंच प्रत्युत्तर दिले आहे. लसीकरणासहित अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून ट्विट करत केंद्रीय मंत्र्यांच्या पत्रातून फक्त महाराष्ट्रा विषयी द्वेष प्रतीत होत आहे असे म्हण्टले आहे.

त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे की,'काल केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी प्रसारित केलेल्या पत्रकातून फक्त महाराष्ट्राविषयीचा द्वेष प्रतीत होत आहे. केवळ महाराष्ट्रात विरोधी विचारांचे सरकार असल्याने महाराष्ट्राला सहकार्य न करण्याची दिल्लीची भूमिका दिसत आहे'.

राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न

जयंत पाटील यांनी पुढे ट्विट मध्ये म्हंटले आहे की, 'कदाचित केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची पूर्ण माहिती नाही किंवा त्यांना अपूर्ण माहिती दिली गेली. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्ण संख्या, किती लसी उपलब्ध झाल्या या प्रश्नांची शहानिशा करण्याआधी परिपत्रक काढून राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत का अशी मनात शंका आहे'.

गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र अभूतपूर्व संकटात सापडले आहे. अगदी सुरुवातीपासूनच महाराष्ट्राचे आरोग्य विभाग, आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे आणि प्रशासन केंद्र सरकारच्या मर्यादित समर्थनासह या संकटाचा जोर जोमाने लढा देत आहेत.

गुजरातची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे जावडेकर हे…

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना आरशासमोर उभं करून विचारलं पाहिजे…

लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर…

लोकसंख्येच्या तुलनेत राज्याला लसी कमी

महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येच्या तुलनेने राज्यांना कमी लसी पुरवण्यात आल्या आहेत असं जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी ट्वीट केले आहे की,'महाराष्ट्राला 85 लाख लसी मिळाल्या आहेत. मात्र महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 12.30 कोटी ॲक्टिव रुग्णसंख्या जवळपास 4.73 लाख इतकी आहे. गुजरातला मिळाल्यात आणि शीला खलसी तिथं लोकसंख्या 6.50 कोटी आहे तर ऍक्टिव्ह रुग्णसंख्या जवळपास 17 हजार.

देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळायला हव्यात. मात्र तसे मुद्दाम होऊ दिले जात नाही आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते.

काय म्हणले केंद्रिय मंत्री हर्षवर्धन?

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारला चांगलंच झापले आहे. राज्य केंद्राकडे मदत मागत आहे पण महाराष्ट्रातील सरकार हे संपूर्ण लोकांचे जीव धोक्यात घालत आहे. केवळ वैयक्तिक वसुलीसाठी संस्थात्मक विलगीकरण याचे नियम कठोरपणे अमलात येत नाहीत असं म्हणत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी जोरदार टीका केली आहे. एका पत्राद्वारे केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्राद्वारे त्यांनी महाविकास आघाडी सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hello Maharashtra
Top