Dailyhunt
खळबळजनक ! घरात शिरुन एकाला सरण रचून जाळले

खळबळजनक ! घरात शिरुन एकाला सरण रचून जाळले

परभणी - शहरातील अत्यंत वर्दळीच्या दर्गा रस्ता परिसरातील अब्दुल रहिमनगरमधील एका घरात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.

औरंगाबादेत ओमायक्रॉनचा एक तर मराठवाड्यात 8 नवे रुग्ण

अनैतिक संबंधाच्या संशयावरून टोळक्याने तरुणाला भर रस्त्यावर…

शहराचा पॉझिटिव्हीटी रेट 8.63 टक्क्यांवर

शहरातील दर्गा रोड परिसरातील अब्दुल रहिम नगरमधील रहिवासी जाकेर अहमेद खुर्शीद अहेमद देशमुख (वय ४८) यांचे स्वतःचे घर आहे. या घरातील मागच्या खोलीमध्ये ही घटना उघडकीस आली. या घरातून शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास धूर येत असल्याने स्थानिक रहिवाशांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर येऊन पाहणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. या घरातील मागच्या खोलीत लाकडे रचून त्यावर जाकेर अहेमद खुर्शीद अहेमद देशमुख यांचा मृतदेह जळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तातडीने हा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला.

या प्रकरणी जाकेर अहेमद खुर्शीद अहेमद देशमुख यांचा भाऊ जुबेर अहेमद यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या तक्रारीमध्ये अनोळखी व्यक्तीने देशमुख यांना जाळून मारल्याचे म्हटले आहे. घटनास्थळास पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक आरसेवार, रामेश्वर तुरनर, फौजदार जमील जहागीरदार, विशाल गायकवाड, शेख जावेद यांनी भेट दिली. वास सुटू नये म्हणून मिठाचा वापरजाकेर अहेमद खुर्शीद अहेमद देशमुख यांच्या मृतदेहाची दुर्गंधी सुटू नये, यासाठी त्यांच्या मृतदेहासाठी मिठाचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांना घटनास्थळी दिसून आले. यावरून खून आधीच केला असावा, असा कयास पोलिसांनी बांधला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hello Maharashtra