Thursday, 29 Jul, 10.25 am HELLO महाराष्ट्र

होम
खळबळजनक माहिती : सातारा जिल्ह्यातील 49 धोकादायक गांवाचे पुनर्वसन रखडले, अद्याप उपयायोजना नाही

पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यांतील देवरूखवाडी, पाटण तालुक्यांतील आंबेघर, ढोकावळे, मिरगाव व कोयना विभातील मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले आहे. निसर्गाच्या या कोपावर रामबाण उपाययोजना करण्यात प्रशासन कमी पडल असल्याची खळबळजनक माहीती सन 2015 चे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी जिॲालिजकल प्रोग्रॅमिॅग बोर्ड व जिॲालॉजिकल डायरेक्टर नागपूर यांना सातारा जिल्ह्यातील धोखादायक 49 गावाबद्दल कळवून देखील आजपर्यंत कोणतीही कारवाई न केल्याने सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली असल्याचे समोर आले आहे.

सातारा जिल्ह्यातील बाधित कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन…

ATSची कारवाई : साताऱ्यात मध्यरात्री तलवारीसह 11 धारधार…

तरूणाई एकवटली अन् एका दिवसात गाव स्वच्छ झाला, तांबवेकरांची…

अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली तालुक्यात भूस्खलन व दरडी कोसळून खूप मोठे न भरुन येणारी मनुष्यहानी व वित्तहानी सातारा जिल्ह्यात झालेली आहे. मात्र एकीकडे प्रशासन ढीगाऱ्याखालून मृत्युचे शवबाहेर काढत असताना पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लावू असा दिखावा करत आहे. सातारा जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या खळबळजनक माहितीने जिल्ह्यातील भूस्खलना बाबतीत पुनर्वसन व योग्य ती खबरदारी घेतली असती तर नक्कीच जीवीतहानीच प्रमाण रोखतां आले असते.

तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी मा. मेबर सेक्रेटरी जिॲालॅजी नागपुर यांना पुनर्वसन व उपाययोजनाची अमंलबजावणी करिता सूचना केलेल्या होत्या. माळीण गावावर अतिवृष्टीमुळे डोगरांचा भाग कोसल्यामुळे गाव नष्ट होण्याची घटना घडली होती. त्याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील 49 गावाची यादी तसेच 49 गावाचे सर्वेक्षण करणेबाबत तसेच 49 गावापैकी सर्वात जास्त व तात्काळ धोका उद्भवण्याची शक्यता असणाऱ्या व तात्काळ पुनर्रवसन करणे आवश्यक असणाऱ्या गावाची क्रमवारी निश्चित करुन व तात्काळ पुर्नवसन करुन देण्याबाबत अहवाल वरीष्ठ वैज्ञानिक भूजल सातारा याच्यामार्फत सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त धोका असणाऱ्या गावाची क्रमवारी निश्चित करुन व सदरचा भूस्खलनाचा धोका कमी करण्याकरीता करावयाच्या उपाययोजनेची गाव निहाय उपाययोजना मेबर सेक्रेटरी डायरेक्टर ॲाफ जिॲालॉजी नागपूर याच्याकडे पत्राद्वारे केली होती.

मात्र सातारा जिल्ह्यातील भुस्खलना विरोधात उपाययोजना न झाल्यामुळे जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, पाटण तालुक्यांतील 37 लोकांचा जीव गमवावा लागला आहे. आता मेल्यावर पुर्नवसन करणार म्हणून मत्री सांगत आहेत. प्रशासन मृतांना आर्थिक मदतीच्या घोषणा करत आहेत. सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याच्या अहवालाला मेबर सेक्रेटरी डायरेक्टर ॲाफ जिॲालॉजी नागपूर यांनी उपाययोजनाची अमंलबजावणी केली असती तर निश्चितच सातारा जिल्ह्यातील भूस्खलनावर होणारी जीवीतहानी रोकता आली असती. सातारा जिल्ह्यातच प्रशासन मुघल राज्य कागदी राज्य म्हणुन ओळखले जाते अगदी त्याच प्रमाणे फक्त कागदोपत्री पत्रव्यवहार करुन फाडली. ठीकठाक ठेवण्यात यशस्वी झाल मात्र सर्वसामान्य नागरिकांचा जीव वाचवण्यात प्रशासन भूतकाळातल्या चुका न सुधारल्यामुळे सर्वसामान्यांच्या जीव गमवावा लागला असल्याचे अधोरेखीत रास्त नाकारतां येत नाही.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hello Maharashtra
Top