Thursday, 29 Jul, 11.57 am HELLO महाराष्ट्र

होम
खरंच चित्रं खूप बोलकी असतात; फडणवीसांचा 'तो' फोटो ट्विट करत चित्रा वाघ यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. तर सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याला येऊन दरडग्रस्तांना भेट दिली. यावेळी त्यांनी दरडग्रस्त लोकांसोबतच भोजन केले. या जेवणाचे फोटो सध्या व्हायरल झाले असून यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकार वर निशाणा साधला आहे.

'एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची जाहिर मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास घेत सावरण्यासाठीचं बळ आणि सोबत असल्याचा विश्वास. खरच चित्रं खुप बोलकी असतात..!!!', असे ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

राज्यातील 25 जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता; आरोग्यमंत्री…

ट्रॅक्टरमधून प्रवास ते पुरग्रस्तांसोबत जेवण;…

संजयजी पेगासिसची चिंता सोडा 'पेंग्वीनची' चिंता करा; चित्रा…

फडणवीस- दरेकरांचे पूरग्रस्तांसोबत जेवण-

सातारा जिल्ह्यातील पूर आणि दरड कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मोरगिरी गावातील शाळेत असणाऱ्या दरडग्रस्त लोकांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आंबेघरमध्ये झालेल्या दरड दुर्घटनेनंतर तिथल्या लोकांची या शाळेत सोय करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपच्या या दोन्ही नेत्यांनी यावेळी या दरडग्रस्तांसोबत शाळेतच जेवणदेखील केलं.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hello Maharashtra
Top