Sunday, 24 Jan, 11.51 am HELLO महाराष्ट्र

होम
काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली ; भाजप खासदाराचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्येमागे काँग्रेसचा हात होता, असं गंभीर आरोप साक्षी महाराज यांनी केला. काँग्रेसच्या लोकांनीच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवल्याचं ते म्हणाले. बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त साक्षी महाराज उत्तर प्रदेशातल्या उन्नवमध्ये बोलत होते.

सुभाषचंद्र बोस यांना वेळेपूर्वीच मृत्यूच्या दाढेत ढकलण्यात आलं होतं. माझा आरोप आहे की, काँग्रेसच्या लोकांनीच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली. त्यांच्या लोकप्रियतेसमोर तर पंडीत नेहरुही कुठेच उभे राहू शकत नव्हते. महात्मा गांधींही काहीच नव्हते' असं वक्तव्य साक्षी महाराज यांनी केलंय.

आझाद मैदानातील शेतकरी आंदोलनाची प्रवीण दरेकरांनी उडवली…

भाजपचं नाव 'भारत जलाओ पार्टी' असं ठेवलं पाहिजे;…

महाराष्ट्राने केलेले कायदे चालतात? मग देशाचे कायदे का नाही?…

स्वातंत्र्य मागितल्यानं देऊन टाकायला इंग्रज एव्हढे सरळ नव्हते. सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलं होतं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दुंगा… रक्ताची किंमत चुकवून आपण स्वातंत्र्य खरेदी केलं होतं' असंही साक्षींनी म्हटलंय.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hello Maharashtra
Top