Wednesday, 05 Aug, 4.15 pm HELLO महाराष्ट्र

महाराष्ट्र
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पनवेल शाखा आयोजित आंतर-महाविद्यालयीन नाट्य सादरीकरण स्पर्धा

'भय इथले संपत नाही.!'

पनवेल: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेल येत्या १८ ॲागस्ट ला महाविद्यालयीन तरुणांसाठी याही वर्षी 'विवेक जागर करंडक' ही नाट्य सादरीकरण स्पर्धा घेऊन येत आहे. शाखेचे हे सलग दुसरे वर्ष आहे आणि महत्वाचे म्हणजे ही स्पर्धा यावर्षी कोरोना आणि सद्यपरिस्थिती लक्षात घेता ॲानलाईन म्हणजेच झूम ॲप व फेसबुक वर लाईव्ह पार पडणार आहे. 'हिंसा के खिलाफ मानवता की ओर' या थीमवर आधारित स्पर्धेसाठी विषय 'भय इथले संपत नाही' असा देण्यास आला आहे. सदर स्पर्धेसाठी नोंदणी आवश्यक आहे.

सलमान खान झाला शेतकरी; ट्रॅक्टरने करतोय नांगरणी…. पहा…

महिलांच्या क्वारंटाईन कक्षाकडे पुरुष रुग्ण पोहचतातच कसे?…

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाग्रस्त महिलेवर…

महाविद्यालयीन तरुणासाठी आपलं म्हणणं सांस्कृतिक अंगाने लोकांपुढे ठेवण्याची ही उत्तम संधी आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाला ७ वर्ष पूर्ण होत आहेत, मारेकरी पकडले असले तरीही खरा सूत्रधार सापडलेला नाही. डॉक्टर दाभोलकरांच्या खूनाचा निषेध करतानाच कोणत्याही प्रकारची हिंसा ही मानवतेला घातकच आहे आणि अशा प्रकारच्या हिंसा सामाजिक स्वास्थ्य बिघडवत असतात, हा विचार समिती रुजवू पाहतेय. म्हणूनच 'हिंसा के खिलाफ, मानवता की ओर' हे अभियान राबवले जाते. तरुणाईने हिंसा मुक्त समाजाचा विचार करावा, मानवतेचा जागर करावा यासाठी ही स्पर्धा घेतली जात आहे. अधिकाधिक तरुणाईने यात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संपर्कासाठी: प्रियांका : ८६५२६१७३८२ वैभव : ८०८२६९३९०३

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hello Maharashtra
Top