Tuesday, 20 Apr, 7.49 pm HELLO महाराष्ट्र

होम
महाराष्ट्रातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी 'हा' आहे ठाकरे सरकारचा अॅक्शन प्लॅन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोनाची बिकट परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 15 दिवस 'ब्रेक द चेन' अंतर्गत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले होते. पण तरीही राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. अशावेळी राज्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या त्याबाबत घोषणा करतीलच. तसेच लसीकरणाबाबतही महाराष्ट्राचा अॅक्शन प्लान ठरल्याचंही टोपेंनी सांगितलं.

ठाकरे सरकार कोसळणार?, अमित शहांचं मोठं विधान !

करोना लस लावल्यानंतर सरकार देतेय बक्षीस; जाणून घ्या काय आहे…

जसा राज्यपालांना तसाच मंत्रिमंडळालाही मान आहे, टाळी एका…

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे परदेशातील लसींना परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्राकडे केल्याचंही टोपे यांनी सांगितलं. लसीकरण वाढलं की हर्ड इम्युनिटीच्या दिशेने आपण जाऊ शकू, असंही टोपे म्हणाले. भारतातील लसीचं उत्पादन मर्यादित आहे. महाराष्ट्रातील किमान 10 कोटी जनतेला लस द्यायची म्हटलं तरी देशातील लसी पुरणार नाहीत, त्यामुळे परदेशातील लसींना परवानगी द्या, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.

राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावला जावा अशी मागणी सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक लॉकडाऊन हवं, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणतोय. ही चेन ब्रेक करण्यासाठी कठोर निर्बंध हवेत. ऑक्सिजन प्लाँट उभारुन हवेतील ऑक्सिजन कामी आणण्याचा प्रय़त्न सुरु आहे, असं सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hello Maharashtra
Top