औरंगाबाद | कोणतीही परवानगी न देता मनपा आयुक्तच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन अनधिकृतपणे कापले याप्रकरणी सिटी चौक पोलिसांनी 28 जुलै रोजी सकाळी मनसेच्या सहा पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. 29 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माने यांनी दिली आहे.
कारची दुचाकीला धडक चार जण गंभीर जखमी
पदवी अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन परीक्षा 29 जुलै पासून
'त्या' पाटबंधारे अधिकाऱ्याचा अटकपूर्व जमिनीसाठी…
मनसेचे जिल्हा संघटक बिपिन शंकर सिंग नाईक (37, विराज नगर गादिया विहार गारखेडा) वैभव मंगल अप्पा मिटकर (35, रा.
शहरवासीयांना आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी वरील सहा जणांनी कोणतीही परवानगी न घेता. अवैधरित्या 18 जुलै रोजी पहाटे मनपा आयुक्त असते कुमार पांडे यांच्या बंगल्याच्या नळ कनेक्शन कापले. या प्रकरणात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनपा पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अशोक पाद्दे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकिल सूर्यकांत सोनटक्के यांनी काम पाहिले.

