होम
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरी वनडे जिंकूनही टीम इंडियाला पेनल्टी; बसला मोठा फटका

कॅनबेरा । भारताने तिसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून ICC Cricket World Cup Super League स्पर्धेत पहिल्या गुणांची कमाई केली. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार खेळ करताना टीम इंडियाला ३०२ धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ २८९ धावांत तंबूत परतला.
भारतानं तिसऱ्या वन डेत विजयासह ICC Cricket World Cup Super Leagueच्या गुणतालिकेत १० गुणांची कमाई केली आणि चौथ्या स्थानावर झेप घेतली. पण, आयसीसीनं टीम इंडियाला धक्का दिला आणि टीम इंडियाची थेट सहाव्या स्थानी घसरण झाली. टीम इंडियाचा हा ICC Cricket World Cup Super League मधील पहिलाच विजय ठरला. या विजयासह त्यांनी १० गुणांची कमाई करताना गुणतक्त्यात चौथे स्थान पटकावले होते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत वारंवार षटकांची गती संथ ठेवल्यानं टीम इंडियाच्या खात्यातून एक गुण वजा करण्यात आला. आयसीसीनं अशी कारवाई करणारा टीम इंडिया पहिलाच संघ ठरला आणि आता ९ गुणांसह ते सहाव्या स्थानी गेले आहेत. ऑस्ट्रेलिया ४० गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर इंग्लंड ३० आणि पाकिस्तान २० गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे. झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्या खात्यातही प्रत्येकी १० गुण असून ते अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत.
अजित आगरकर बनणार चीफ सेलेक्टर, बीसीसीआयने नाव केले…
जड्डूमुळे मी आणि अजिंक्य मेलो असतो! हिटमॅन रोहित शर्माचा…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम…
इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात गतवर्षी झालेल्या वन डे मालिकेतून World Cup Super League ला सुरुवात झाली. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड चार, तर आयर्लंडनं एका गुणाची कमाई केली. आतापर्यंत World Cup Super League नुसार सहा संघांमध्ये मालिका झाली आहे. पाकिस्तान व झिम्बाब्वे हे अन्य दोन संघ आहेत.
दरम्यान, टीम इंडियाला या गुणतक्त्यातील क्रमवारीचा फार फरक पडणार नाही. २०२३चा वर्ल्ड कप भारतात होणार असल्यानं यजमान म्हणून टीम इंडियानं आपलं स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे World Cup Super League च्या गुणतक्त्यातील अव्वल सात संघ २०२३च्या वर्ल्ड कप साठी पात्र ठरणार आहेत.