Thursday, 04 Mar, 9.17 am HELLO महाराष्ट्र

होम
सचिन-सेहवाग पुन्हा करणार आतषबाजी ; 5 मार्च पासून सुरु होणार 'ही' मोठी स्पर्धा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | क्रिकेट चाहत्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. क्रिकेट मधील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे पुन्हा एकदा मनोरंजन होणार आहे. हे सर्व खेळाडू 5 मार्च पासुन सुरू होणाऱ्या रोड सेफटी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. खुद्द सचिन तेंडुलकर या स्पर्धेचा ब्रँड अँबेसिडर आहे.

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज मागील वर्षी सुरू झाली होती, परंतु कोविड -19 च्या साथीच्या रोगामुळे ही स्पर्धा ११ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आणि केवळ चार सामने खेळले गेले. आता उर्वरित सामने छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये 65000 प्रेक्षकांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या स्टेडियममध्ये आयोजित करण्यात येतील आणि भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 50 टक्के प्रेक्षक या स्टेडियमला ​​भेट देऊ शकतील.

मी आधीच म्हणालो होतो मुंबई इंडियन्सचा संघ टीम इंडियापेक्षा…

रोहित संघात नसेल तर माझा टीव्ही बंद राहील ; विराटच्या…

अस वाटत होतं सेहवागच डाव्या हाताने फलंदाजी करतोय ; इंझमाम…

रोड सेफ्टी वर्ल्ड मालिकेत, इंग्लंड, दक्षिण आफ्रीका, श्रीलंका, वेस्टइंडीज, बांगलादेश आणि यजमान भारत या 6 टीम टूर्नामेंटमध्ये भाग घेणार आहे. तर या टूर्नामेंटमध्ये सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सहवाग, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान, जोंटी रोड्स आणि केविन पीटरसनसारखे उत्कृष्ट आणि महान खेळाडू खेऴताना पाहायला मिऴणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा 'hello news'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hello Maharashtra
Top